VIDEO : विजयी फटका खेळताना बॅडमिंटनपटूचे तुटले रॅकेट
🎬 Watch Now: Feature Video
माजी विश्वविजेता बॅडमिंटनपटू व्हिक्टर एक्सेलसेनने मलेशियाच्या डॅरेन एलवलाईईला पराभूत करत वर्ल्ड टूर सुपर १००० टॉयोटा ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. एक्सेलसेनने सरळ सेटमध्ये एलवलाईईवर मात दिली. या सामन्यात विजयी फटका खेळताना एक्सेलसेनचे रॅकेट तुटले. महत्त्वाचे म्हणजे एक्सलसेनचे रॅकेट जरी तुटले असले तरी खेळलेल्या फटक्यामुळे एक्सेलसेनला सामना जिंकता आला. अंतिम सामन्यात तो तायवानच्या चोउ तिएन चेनशी भिडणार आहे.