इशान किशनच्या आई-वडिलांशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित - इशान किशनच्या आई-वडिलांशी खास बातचित
🎬 Watch Now: Feature Video
पटना - बिहारचा हरहुन्नरी खेळाडू इशान किशनने टी-२० पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत आपली प्रतिभा सिद्ध केली. त्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ३२ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. यात त्याने ५ चौकार आणि ४ षटकार खेचले. किशनच्या या खेळीच्या जोरावर आणि विराट कोहलीच्या नाबाद ७३ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला. 'ईटीव्ही भारत'ने किशनच्या कुटुंबियांशी बातचित केली. यात त्याच्या आई-वडिलांनी किशनच्या खेळीवर आनंद व्यक्त केला. पाहा किशनच्या खेळीवर काय म्हणाले त्याचे आई-वडिल...