टिम पेन ऑस्ट्रेलियाचा शानदार कर्णधार - लँगर - जस्टिन लँगर लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी कर्णधार टिम पेनचा बचाव केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी रंगतदार ठरली. या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयाची संधी होती. मात्र, भारताने चिवट फलंदाजी करत ही कसोटी अनिर्णित सोडवली. या सामन्यानंतर पेनच्या नेतृत्वावर आणि त्याच्या सामन्यादरम्यानच्या डावपेचांवर टीका करण्यात आली. मात्र, लँगर यांनी पेनची पाठराखण करत तो ऑस्ट्रेलियाचा शानदार कर्णधार असल्याचे म्हटले आहे.