ETV Bharat / technology

Realme 14 Pro आणि Realme14 Pro+5G थोड्याच वेळात लॉंच होणार, स्पेसिफिकेशन, किंमत, लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहणार? - REALME 14 PRO 5G SERIES

Realme आज भारतीय बाजारात Realme 14 Pro ची नवीन मालिका सादर करण्यास सज्ज आहे. यात Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ फोन लॉंच होतील

Realme 14 Pro 5G Series
Realme 14 Pro 5G Series (Realme (You Tube))
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 16, 2025, 10:16 AM IST

हैदराबाद : Realme 14 Pro 5G मालिका भारतात 16 जानेवारी म्हणजे आज Snapdragon 7s Gen 3 चिपसेटसह लाँच केली होणार आहे. या मालिकेत Realme 14 Pro आणि Realme 14 Pro + 5G फोन लॉंच होतील. लाँच होण्यापूर्वीच हे स्पेसिफिकेशन उघड झाले होते. कंपनी सतत स्मार्टफोन मालिकेबद्दल टीझ करत आहे. Realme 14 Pro + 5G फोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आले आहे. ही मालिका 6,000mAh बॅटरीसह येईल.

Realme च्या नवीनतम टीझरमध्ये Relame 14 Pro 5G मालिकेत Snapdragon 7s Gen 3 चिपसेट मिळेल. तथापि, हे चिपसेट दोन्ही मॉडेलपैकी कोणत्या मॉडेलला मिळेल, हे कंपनीनं स्पष्ट केलेलं नाहीय. असं मानलं जातंय की Realme 14 Pro 5G मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 एनर्जी SoC सह सादर केले जाईल. आगामी Realme मालिका फ्लिपकार्ट आणि Realme ई-स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. लाँचच्या वेळी किंमत आणि उपलब्धतेची अचूक माहिती समोर येईल. हे फोन पर्ल व्हाइट आणि सुएड ग्रे रंगात आणि दोन खास शेड्समध्ये उपलब्ध असतील.

Realme 14 Pro 5G स्पेसिफिकेशन
अलीकडेच एका टिपस्टरनं मालिकेचं प्रमोशनल पोस्टर्स शेअर केलं होतं, ज्यामध्ये दोन्ही मॉडेल्सचे काही स्पेसिफिकेशन उघड झाले आहेत. Realme 14 Pro 5G मध्ये डायमेन्सिटी 7300 एनर्जी चिपसेट मिळण्याची अपेक्षा आहे. हा फोन 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. 14 Pro 5G मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसह 50-मेगापिक्सेल सोनी IMX882 प्रायमरी रिअर सेन्सर मिळण्याची शक्यता आहे. समोर 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असेल.

7s Gen 3 प्रोसेसर
Realme 14 Pro + 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसर असण्याची पुष्टी झाली आहे. त्याच वेळी, तो 80W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. फोन 6,000mAh बॅटरीसह येईल याची देखील पुष्टी झाली आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झाले तर, यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि ३x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि ११२-डिग्री अल्ट्रावाइड शूटर असू शकतो. त्याच वेळी, समोर ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असेल. दोन्ही फोन पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP66, IP6,8 आणि IP69 रेटिंगसह सुसज्ज असतील. Realme नं आधीच कोल्ड सेन्सिटिव्ह कलर चेंजिंग टेक्नॉलॉजी जाहीर केलीय. जी 16 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात पर्ल व्हाइट व्हेरियंटला व्हायब्रंट ब्लूमध्ये बदलते.

Realme 14 Pro मालिकेचा लाँच इव्हेंट कुठं पहाणार?

Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ आज दुपारी 12 वाजता भारतात लाँच होतील. हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाईव्ह-स्ट्रीम केला जाईल. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी, आम्ही थेट स्ट्रीमिंग लिंक दिली आहे, ज्यावर क्लिक करून तुम्ही येथे थेट कार्यक्रम पाहू शकता.

हे वाचलंत का :

  1. Apple iPhone 16 बंपर सूट, खरेदीवर 15 हजारांची सूट मिळण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा
  2. मार्क झुकरबर्ग यांच्या टीकेवर मेटा इंडियानं मागितली माफी, वाचा काय आहे प्रकरण?
  3. NEET UG 2025 नोंदणीमध्ये आधार कार्ड अपार कार्डशी जोडण्याची NTAची सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.