HBD RONALDO : फुटबॉलविश्वाचा 'तारा' झाला ३६ वर्षांचा
🎬 Watch Now: Feature Video
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आज आपला ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. पोर्तुगालसोबत रोनाल्डोने स्पोर्टिंग सीपी, मँचेस्टर युनाईटेड, रियाल माद्रिद आणि जुव्हेंटसकडून खेळताना ७६० पेक्षा अधिक गोल नोंदवले आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने ५ चॅम्पियन लीग, २ ला-लीगा, ३ प्रीमियर लीग, २ सिरी असे ३० पेक्षा अधिक किताब पटकावले आहेत. त्याने आपल्या फुटबॉल कारकिर्दीत ५ वेला बलोन डी ओर पुरस्कारही मिळवला आहे.