जाफरचा राजीनामा : स्टेडियमपासून रस्त्यावर पोहोचलेला वाद - वसीम जाफर का इस्तीफा
🎬 Watch Now: Feature Video
२०१९मध्ये उत्तराखंडच्या क्रिकेट असोसिएशनला बीसीसीआयकडून मान्यता मिळाली. मात्र, या काळापासूनन असोसिएशनमध्ये वाद पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत हा वाद संघातच मर्यादित होता. मात्र, मुख्य प्रशिक्षक वसीम जाफरच्या राजीनाम्यानंतर हा वाद स्टेडियमपासून रस्त्यावर पोहोचला आहे. खेळाडूंच्या निवड प्रक्रियेपासून असोसिएशनच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. माजी कॅबिनेट मंत्री आणि उत्तराखंडच्या क्रिकेट असोसिएशनच्या पायाभरणीत मोलाची भूमिका बजावणारे हीरासिंग बिष्ट निराश आणि संतप्त आहेत. त्यांनी असोसिएशनवर 'वन मॅन शो' आणि मनमानी केल्याचा आरोप केला आहे.