पाहा: अमृता सिंगच्या वाढदिवशी साराने शेअर केले हुबेहुब 'आई'सारखे फोटो - सारा अलीने अमृताला शुभेच्छा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई (महाराष्ट्र): आज अभिनेत्री अमृता सिंगचा वाढदिवस आहे आणि तिचा दिवस खास बनवण्यासाठी तिची मुलगी सारा अली खान हिने सोशल मीडियावर तिच्यासाठी एक मनापासून पोस्ट लिहिली आहे. इंस्टाग्रामवर साराने वेगवेगळ्या प्रसंगांमधले तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ते अगदी तिच्या आईसारखेच आहेत. सारा ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. अमृता आणि सैफ 2004 मध्ये विभक्त झाले होते. अमृता आणि सैफ यांना इब्राहिम हा मुलगा देखील आहे.