संजय दत्तच्या उपस्थितीत निर्माते आनंद पंडित याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन - anand pandit birthday
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - चित्रपट निर्माते आनंद पंडित यांचा २१ डिसेंबरला वाढदिवस होता. आनंद यांनी 'टोटल धमाल', 'मिसिंग', 'सरकार ३' आणि ग्रेट ग्रँड मस्ती यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेता संजय दत्त आणि इतर बऱ्याच कलाकारांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या पार्टीची थिम 'म्युझिक फिस्ट' अशी होती. त्यामुळे संगीत क्षेत्रातील बऱ्याच बऱ्याच कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती. सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यावेळी उपस्थित होते.
तारक मेहता का उलटा चश्मामधील शैलेश लोढा यांनीही हजेरी लावली होती. आपल्या मित्र मैत्रीणींच्या उपस्थितीत आनंद पंडित यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं.