आईला मदत केल्याबद्दल राखी सावंतने मानले सलमान खानचे आभार - काश्मेरा शाह आणि संभव सेठ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10796297-636-10796297-1614398782828.jpg)
अभिनेत्री राखी सावंतने सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. सध्या राखीची आईच्या मुंबईत रूग्णालयात कर्करोगाचा उपचार घेत आहे. तिला खान कुटुंबियांनी मदत केल्याबद्दल राखीने एक व्हिडिओ शेअर करुन आभार व्यक्त केले आहेत. राखीचे सहकारी काश्मेरा शाह आणि संभव सेठ यांनी नुकतीच तिच्या आईला रुग्णालयात भेट दिली होती. सलमान-होस्ट केलेल्या रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सीझन 14 मध्ये राखीने अंतिम फेरी गाठली होती आणि गेल्या आठवड्यात फिनालेमध्ये 14 लाख रुपये घेऊन ती तेथून निघून गेली होती.