पद्मिनी कोल्हापूरेंनी दिला ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा - padmini kolhapure on Rishi Kapoor
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने सिनेजगताला दुसरा धक्का बसला आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. ऋषी कपूर यांच्या करिअरमधला सुपरहिट चित्रपट 'प्रेमरोग' आजही प्रेक्षकांच्या मनात रुजलेला आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत त्यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.