केआरकेच्या दारात पोहोचला मिका सिंग, मारहाण करणार नसल्याचे दिले आश्वासन - केआरकेच्या मुंबईच्या घराबाहेर मिका सिंग
🎬 Watch Now: Feature Video
बॉलिवूड स्टार सलमानबरोबर सध्या कमाल आर खान (केआरके) चा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गायक मिका सिंगने एक गाणे तयार केलंय त्याची शीर्षक आहे 'केआरके कुत्ता'. हे गाणे म्हणजे केआरकेला उत्तर असल्याचे मिका सिंग म्हणाला. गुरूवारी मिका सिंग केआरकेच्या मुंबईच्या घराबाहेर पोहोचला. सलमानसोबतच्या वादामुळे केआरकेने हे घर विकल्याचे सांगितले जाते. यावेळी मिका म्हणाला, की घाबरुन पळून जाण्याची काही गरज नाही. तू कुठंही असलास तरी माझ्या मुलासारखा आहेस.