कृती सेनॉनची विमानतळावर झलक, करिश्मा, रणधीर यांची करिनाची घरी भेट - बॉलिवूड सेलेब्रिटी स्पॉटेड
🎬 Watch Now: Feature Video

मुंबईत हौशी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यामध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड सेलेब्रिटी कैद झाले आहेत. वरुण धवनची भूमिका असलेल्या 'भेडिया' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करुन कृती सेनॉन मुंबईत परतली. कृष्णा अभिषेकला वांद्रे येथील फूड हॉलमध्ये पत्नी कश्मेरा शहासोबत क्लिक करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर यांना मुलगी करिना कपूरच्या घराबाहेर टिपण्यात आले. करिश्मा कपूरलाही बहिणीच्या घराबाहेर मुलासोबत क्लिक करण्यात आले.