Flashback 2019: प्रेक्षकांवर प्रभाव टाकलेले मराठी चित्रपट - marathi cinema list in 2019
🎬 Watch Now: Feature Video
२०१९ सालाला राम राम करताना गेल्या वर्षभरात मराठी प्रेक्षकांना प्रभावित करुन गेलेल्या काही चित्रपटांचा आढावा आपण घेत आहोत. २०१९ वर्षाला राम राम करीत असताना मराठी चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या काही चित्रपटांकडे आपण वळून पाहूयात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठे आकर्षण होते ते म्हणजे 'भाई : व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे. या चित्रपटावर टीका करणारेही काहीजण होते तर बऱ्याच जणांच्या पसंतीस चित्रपट उतरला होता.