ब्रेक-अपबद्दल बोलण्यास आवडणार नाही : नेहा कक्कडबद्दल हिमांश कोहलीची प्रतिक्रिया - Himansh Kohli on break-up
🎬 Watch Now: Feature Video
'वफा ना रास आयी' या नवीन म्युझिक व्हिडिओच्या यशाचा जल्लोष करणाऱ्या अभिनेता हिमांश कोहलीने म्हटले आहे की, आता आपल्याला गायिका नेहा कक्करसोबतच्या ब्रेक-अपबद्दल बोलण्यास आवडणार नाही. हिमांश आणि नेहाने २०१८ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. हा विषय बॉलिवूडमध्ये टॉक ऑफ द टाऊन बनला होता. आता नेहाने गायक-अभिनेता रोहनप्रीत सिंगसोबत विवाह केला असून ते आनंदात संसार करीत आहेत.