बिग बॉस मराठी-3 विजेत्या विशाल निकमने घेतले जोतिबा आणि अंबाबाईचे दर्शन - Vishal Nikam took Jyotiba Darshan
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर : बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकमने आज करवीर निवासिनी आई अंबाबाई तसेच श्री जोतीबाचे दर्शन घेतले. त्याच्यासोबत बिस बॉसच्या घरात मित्र बनलेला विकास पाटील सुद्धा होता. खरंतर विशाल निकमला 'दख्खनचा राजा जोतिबा' या मालिकेने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवलं होतं आणि म्हणूनच त्याने कोल्हापुरातील जोतिबाचे दर्शन घेतले. त्यानंतर दोघांनी सुद्धा अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी विशाल निकमने जोतिबा मंदिर परिसरात गुलालाची उधळण करत आपल्या चाहत्यांसोबत फोटो सुद्धा काढले. शिवाय परिसरातच गोड्यावर बसून एक फेरफटका मारून फोटोसेशन सुद्धा केले. यावेळी त्याने सर्वांना नवीन वर्ष आनंदाचे तसेच आरोग्यदायी जावे अशी प्रार्थना सुद्धा जोतिबा तसेच अंबाबाई चरणी केली. दरम्यान, बिग बॉसच्या घरात विशालचा सर्वात जवळचा बनलेला मित्र विकास पाटील सुद्धा आला होता. त्या दोघांची जोडी बिग बॉस च्या घराबाहेर सुद्धा पाहायला मिळाल्याने दोघांमधील असलेले मैत्रीचे घट्ट नाते पुन्हा अधोरेखित झाले आहे.