माझा छळ झाला! गमतीदार फोटोंसह बिग बींनी चाहत्यांसोबत शेअर केले आपले दुःख.. - Latest Entertainment News
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9943879-thumbnail-3x2-bigb.jpg)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी शनिवारी शूटिंगच्या वेळी आपल्यावर झालेला सर्वात मोठा छळ उघडकीस आणला. यामध्ये बिग बींना एका हातात रसगुल्ला आणि दुसऱ्या हातात गुलाबजामून धरून ते खाल्ल्यानंतर किती आनंद होत आहे याचा अभिनय करण्यास सांगण्यात आले. प्रत्यक्षात प्रकृती स्वास्थ्यासाठी बिग बींनी हे पदार्थ वर्ज्य केले आहेत. अशा स्थितीत आवडते पदार्थ खाऊ शकत नसतानाही तसा अभिनय करावा लागणे ही अक्षरशः छळवणूक असल्याचे अमिताभ यांनी म्हटले आहे. याबाबत पोस्ट करत बिग बींनी गमतीदार फोटोंसह आपले दुःख चाहत्यांसोबत शेअर केले आहे.