Shiva Jayanti In Nagpur : नागपूरात तिथीनुसार शिवजयंती साजरी; सर्वत्र ढोल ताशाचा गजर
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - नागपूरात महालाच्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने दोन वर्षांनी शिव जयंती सोहळा साजरा करण्यात आला. महालच्या गेटवर शिवतीर्थ येथे आज (दि. 21 मार्च) सकाळी 7 वाजता दुग्धाभिषेक करत महाराजांच्या प्रतिमेला नवीन वस्त्र परिधान करून पूजन करण्यात आले. (Shiva Jayanti In Nagpur) शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळा समिती महालच्या वतीने मागील दोन वर्षात कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा होत होता. यंदा मात्र ढोल तशा, भगवा पताका हातात घेत फडकत उत्साहात आणि आनंदात शिवजयंती साजरी करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST