Rohini Khadse : गिरीश महाजन- एकनाथ खडसे यांचे जिव्हाळ्याचे संबंध.. रोहिणी खडसे म्हणाल्या.. - गिरीश महाजन मुलीचे लग्न
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव : एकीकडे गिरीश महाजन- एकनाथ खडसे यांच्यात सातत्याने आरोप -प्रत्यारोप होत आहेत. तर दुसरीकडे गिरीश महाजन यांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा आज पार ( Girish Mahajan Daughter Wedding ) पडला. यावेळी स्वतः एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadse ) उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना महाजन परिवारातील या विवाह सोहळ्यात प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी पाठविले ( Rohini Khadse At Mahajan Wedding ) होते. रोहिणी यावेळी म्हणाल्या की, महाजन आणि खडसे परिवाराचे ३० वर्षाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लग्नाच्या निमित्ताने आम्ही त्यांना शुभेछा देण्यासाठी आलो. आज कोणतेही राजकीय विषयावर भाष्य करणार नाही. एकनाथ खडसे विवाह सोहळ्याला येणार की नाही याबाबत मी सांगू शकत नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST