Fish Like Human Face : आंध्रात आढळला मानवाच्या चेहऱ्यासारखा दिसणारा दुर्मिळ मासा; खाण्याचे होणार नाही धाडस,कारण..

By

Published : Mar 14, 2022, 5:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

thumbnail
अमरावती ( आंध्रप्रदेश ) - माशांचे तुम्ही अनेक प्रकार पाहिले असतील. पण, आंध्रप्रदेशमधील आढळलेल्या माशाला पाहून मच्छिमारही चक्रावून गेले आहेत. कारण, या माशाचा चेहरा हा मानवासारखा ( fish like human face in Andhra ) आहे. या माशाला मच्छिमाराने स्पर्श करताच हा मासा चेंडुप्रमाणे आकार बदलू ( Fish swells like a ball ) लागला. हा मासा मच्छिमाराने पूर्व गोदावरी जिल्ह्यातील उप्पलगुप्तममधील वसलथिप्पा नदीत पकडला ( Ballon fish in East Godavari district ) आहे. मत्स्यतज्ज्ञ गोपालकृष्णा यांच्या माहितीनुसार हा विषारी मासा आहे. या माशाला पफर ( Puffer fish ) , बलून ( baloon fish ) किंवा ग्लोब फिश (globe fish ) अशी नावे आहेत. टेट्राडोन या प्राणीवर्गातील हा मासा आहे. हा मासा विषारी माशांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आहे. त्याच्या लाळेमुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. हा मासा पाहून जैविक विविधतेची खात्री पटते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.