- मेष (ARIES) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम आणि व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद आणि मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. भोजन नेहेमीच्या वेळेस घेता येणार नाही. अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील.
- वृषभ (TAURUS) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन आणि स्थिर विचारांमुळं सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आज मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल.
- मिथुन (GEMINI) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज आपल्या उक्ती आणि कृतीमुळं काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळं वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. एखादा अपघात संभवतो. कुटुंबियांशी वाद होतील. प्राप्तीच्या मानाने खर्चात वाढ होईल. मन:शांतीसाठी प्रयत्नशील राहावं लागेल.
- कर्क (CANCER) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी, व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आर्थिक योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाण्याचे बेत आखाल.
- सिंह (LEO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आज आपल्या दृढ आत्मविश्वास आणि मनोबल ह्यामुळं आपण कामात यशस्वी व्हाल. नोकरी-व्यापार, व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावीत होतील. वडिलांकडून काही फायदा होऊ शकतो. वाहन, संपत्ती ह्या संबंधीची कामे सहज पूर्ण होतील. सरकारी कामात यश मिळेल. कौटुंबिक सौख्य मिळेल.
- कन्या (VIRGO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्या नातेवाईकां कडून आनंददायी बातमी समजल्यानं आपण आनंदित व्हाल. एखाद्या सहलीसाठी खर्च होईल. भावंडांकडून काही फायदा होण्याची शक्यता आहे. परदेशात जाऊ इच्छिणार्यांना परदेशात जाण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
- तूळ (LIBRA) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज शक्यतो कोणत्याही नवीन कामाचा आरंभ न करणं हिताचं राहील. आपलं वक्तव्य आणि वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. गूढ विद्येचे आकर्षण वाढेल. आज एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. मानसिक शांतीसाठी खूप प्रयत्न करावे लागतील.
- वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आजचा दिवस आपण आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. उत्तम भोजन आणि नवीन आभूषणे मिळाल्यानं आपण खूप आनंदित व्हाल. व्यापार-भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक क्षेत्रात मान-सन्मान होतील. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाटेल. पत्नीसह वेळ आनंदात घालवाल.
- धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवाल. कार्यालयात सहकारी व हाताखालच्या व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचा संभव आहे.
- मकर (CAPRICORN) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. शारीरिकदृष्टया आळस, थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. द्विधा मनःस्थितीमुळं निर्णय घेण्यात अडचणी येतील. संततीच्या आरोग्य विषयक तक्रारी राहतील.
- कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळं मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. घर, संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत. आईकडून लाभ होईल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
- मीन (PISCES) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. आपली सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यामुळं कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. मित्रांसह प्रवास होऊ शकेल. भावंडांशी जवळीक वाढेल. सामाजिक मान - सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
हेही वाचा -