अमरावती Tirupati Laddu Controversy : तिरुपती लाडू वादावरून देशात खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी लाडू प्रसादात चरबी मिसळल्याचा दावा केलाय. या मुद्द्यावरून आता चंद्राबाबू नायडू आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या प्रकरणावर आमने-सामने आलेत. दरम्यान, जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी चंद्रबाबू नायडू यांच्यावर तिरुपती देवस्थानाच्या पावित्र्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय.
Kind Attention: Please take note of the facts presented in this letter addressed to the Honorable Prime Minister Narendra Modi Ji regarding the severe pain caused to the religious sentiments of Hindu devotees https://t.co/TI3vgkaZ0e. @timesofindia @htTweets @IndianExpress…
— YS Jagan Mohan Reddy (@ysjagan) September 22, 2024
चंद्राबाबू नायडू खोटं बोलणारे : जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, "आंध्रप्रदेश राज्यात घडत असलेल्या निंदनीय घटनांकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या पावित्र्याचं, अखंडतेचं आणि प्रतिष्ठेचं कधीही भरून न येणारे नुकसान झालंय. भगवान वेंकटेश्वरांचे भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी भक्त आहेत. चंद्राबाबू नायडू हे खोटं बोलणारे आहेत. ते राजकीय हेतूसाठी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी खेळत आहेत. त्यांच्या विधानामुळं भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली नाही, तर याचे वाईट परिणाम होऊ शकतात."
Tirupati Prasadam row | Former Andhra Pradesh CM YS Jagana Mohan Reddy writes to Prime Minister Narendra Modi.
— ANI (@ANI) September 22, 2024
" ...attempts are being made by cm chandrababu naidu to irreparably tarnish the sanctity, integrity and reputation of tirumala tirupati devasthanams .." pic.twitter.com/pfby2Kre76
तिरुमला तिरुपती मंदिरात प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणारं तूप भेसळयुक्त आहे आणि त्या तुपात प्राण्यांची वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी टीटीडीच्या कारभाराविरोधात उघड खोटं पसरवलं आहे. असंही जगनमोहन रेड्डी यांनी पत्रात नमुद केलंय.
Vijayawada | On Tirupati Prasadam row, Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu today said, " we are forming a special investigation team (sit) comprising of officers of igp and above posts. the sit will submit a report to the government and we will take action based on that report… pic.twitter.com/3UJp9EqOru
— ANI (@ANI) September 22, 2024
चौकशीसाठी विशेष तपास पथक : चंद्राबाबू नायडू यांनी आज सांगितलं की, "आम्ही या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करणार आहोत. ज्यामध्ये आयजीपी आणि त्यावरील पदांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. हे तपास पथक सरकारला अहवाल सादर करेल. आम्ही त्या अहवालाच्या आधारे कारवाई करू, जेणेकरून अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही."
हेही वाचा
- ढोल-ताशांचा गजर, शिवरायांचा जयजयकार; अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं मराठमोळ्या स्टाईलनं स्वागत - PM Modi Visit USA
- ...तर केदारनाथमध्ये 2013 पेक्षा मोठा अनर्थ घडू शकतो; तिरुपती प्रसादाचा वाद बाबांच्या दरबारी - Kedarnath Temple Prasadam
- आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण करणार 11 दिवसांचा उपवास; म्हणाले, "विश्वासघात झाल्यासारखं..." - Tirupati Prasad Row