मुंबई Batsman Out on Zero : कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात एका फलंदाजाला शून्यावर बाद होणं ही अत्यंत निराशाजनक आणि दुःखाची बाब आहे. फलंदाजासाठी हे एक दुःस्वप्न असू शकतं, कारण त्याला त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात काहीतरी संस्मरणीय करायचं असतं. परंतु, शून्यावर बाद होणं त्याच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. जगातील प्रत्येक क्रिकेटपटूचं आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळून मोठे विक्रम करुन आपलं नाव उंचावण्याचं स्वप्न असतं. पदार्पणाच्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होण्याचा लज्जास्पद विक्रम कोणत्याही क्रिकेटपटूला करायला आवडत नाही. मात्र, जगात असे 10 दुर्दैवी फलंदाज आहेत जे त्यांच्या कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाले आहेत.
ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) :
वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. ब्रायन लारा 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
मुरली विजय (भारत) :
भारताचा माजी फलंदाज मुरली विजय कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. मुरली विजयनं 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज) :
वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. शिवनारायण चंद्रपॉलनं 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) :
दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. हाशिम आमला 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
यशपाल शर्मा (भारत) :
भारताचा माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. यशपाल शर्मानं 1983 साली वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
मायकेल वॉन (इंग्लंड) :
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. मायकेल वॉननं 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
अँड्र्यू सायमंड्स (ऑस्ट्रेलिया) :
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. अँड्र्यू सायमंड्सनं 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
सुरेश रैना (भारत) : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. सुरेश रैनानं शेवटचा कसोटी सामना 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
शोएब मलिक (पाकिस्तान) : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला. शोएब मलिकनं शेवटचा कसोटी सामना 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडिज) : कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज मार्लन सॅम्युअल्स शून्यावर बाद झाला. मार्लन सॅम्युअल्सनं शेवटचा कसोटी सामना 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता.
हेही वाचा :