Life To Dying Camel : मरायला टेकलेल्या उंटाला तरुणांनी दिले नवजीवन, पाहा व्हिडिओ - भावनगरमध्ये उंटाला वाचवले
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18529071-thumbnail-16x9-camel.jpg)
भावनगर(गुजरात) - गुजरातमधील भावनगरच्या नर्मद गावात एका उंटाला त्याच्या मालकाने ओसाड जागी सोडून दिले होते. पाण्याविना भटकणाऱ्या या उंटांच्या मदतीसाठी काही तरुण देवदूत म्हणून पुढे आले. त्यांनी उंटाची माहिती प्राणी बचाव संस्थेला दिल्यानंतर त्या उंटाला विशिष्ट वाहनाच्या साहाय्याने उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांना या परिसरात एकूण चार उंट फिरताना दिसले होते. त्यापैकी एक उंट चालण्याच्या स्थितीत नव्हता. उंटाला मदत करणारा शक्ती शियाल म्हणाला की, नर्मदजवळील खारमध्ये 43 अंश तापमानात निपचित उंट पडून होता. त्याचा मालक त्याला सोडून निघून गेला होता. आम्ही राज हंस क्लब आणि गौररक्षक ग्रुपला याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वाहन आणले. पण वाहन आत जाऊ शकले नाही. मग आम्ही उंटाला ओढून वाहनापर्यंत आणले. आमची सरकारलाही विनंती आहे की अशा भटक्या प्राण्यांसाठी काही कायदा केला पाहिजे जेणेकरून त्यांना असा त्रास सहन करावा लागू नये.