एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री गुजरात.. फलक हाती घेत मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर कॉंग्रेसचे जोरदार आंदोलन, पाहा व्हिडिओ - एकनाथ शिंदे
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर: फॉक्सकॉन vedanta foxconn project पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्पही tata airbus project गुजरातला गेल्याच्या विरोधात आज युवक काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे eknath shinde यांच्या नागपुरातील रामगिरी या शासकीय बंगल्यासमोर आंदोलन केलं. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी एकनाथ शिंदे गुजरातचे मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक हाती घेऊन आंदोलन केले. मात्र हे आंदोलन सुरू होताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. टाटा एअरबस उद्योग प्रकल्प नागपूरात येणार होता, पण हा प्रकल्प ही गुजरातने पळवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST