Watch Video : आईने लेकराला वाचवण्यासाठी फोडला टाहो; नदीपात्रात युवक वाहून गेला अन....
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर (शिर्डी) : रंधा धबधब्याजवळ प्रवरा नदीपात्रात युवकाचा पाय घसरून पडून वाहून गेल्याची घटना घडली आहे. नाशिक येथून भंडारदरा पाहण्यासाठी आलेल्या सोनटक्के कुटुंबीयांचा संचित रंधा धबधब्याजवळ पाण्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहाच्या पाण्यात वाहू लागला. त्याची आई सीमा सोनटक्के यांनी आरडाओरड करत माझ्या संचितला कुणी तरी वाचवा अशी हाक मारली. त्यावेळी उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थ, होमगार्ड, पोलीस यांनी दोर टाकून संचितचे प्राण वाचवले. संचित वाहत जात एका मोठ्या खडकाला अडकला. पटेकर, जाधव यांनी दोर एका झाडाला बांधून दोर संचितच्या दिशेने फेकली अन संचित भीतीने थरथरत होता. त्याने अचूक दोर पकडला व आपल्या कंबरेल बांधला. स्थानिकांनी दोर ओढून त्याला काठावर आणले आणि त्याचा जीव वाचवला. तो बाहेर येताच त्याच्या आईने व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. ही घटना दुपारी ११ च्या दरम्यान घडली. रंधा धबधब्याजवळ मोठ्या संख्येने पर्यटक येतात व सरळ धबधब्याजवळ उतरतात. त्यामुळे दुर्घटना घडत असल्याने पर्यटकांनी आपल्या जीवाची जबाबदारी स्वीकारून पर्यटनस्थळी यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.