Marathi boy china girl marriage: चीनच्या मुलीची नगर जिल्ह्यातील भोजदरीत लगीन घाई; योग शिक्षणातून आला लग्नाचा योगायोग - Rahul Hande from Sangamner Marry to China girl

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 2, 2023, 2:17 PM IST

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील आशिया खंडातील सर्वात उंच आणि मोठे असलेले बाळेश्वरचे पठार हे प्रसिद्ध आहे. याच पठार भागातून भोजदरीच्या माध्यमिक विद्यालयातून शिकलेला विद्यार्थी राहुल याने योग क्षेत्रात भविष्य शोधत शिक्षण पुर्ण करत योग शिक्षणाचे धडे देण्यासाठी थेट चीन गाठले. तेथेच त्याची ओळख तेथील योंग छांग व त्यांची पत्नी मेई लियान या जोडप्याशी झाली. या जोडप्याने नंतर आपली कन्या शान हिच्यासाठी राहुलकडे लग्नाची मागणी घातली. राहुल व त्यांची आई, वडील, भाऊ, बहीण सर्वांनी संमती दिल्यानंतर आता भारतीय पध्दतीने या दोघांचा विवाह संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथे पार पडत आहे. या दोघांचा हळदी समारंभ रविवार २ जुलै २०२३ व लग्न समारंभ सोमवार ३ जुलै २३ रोजी घारगाव येथे पार पडत आहे. योग शिक्षण केंद्र चालवण्यासाठी चीनमध्ये गेलेल्या संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथील रहिवासी असलेल्या योगशिक्षक राहुल हांडे याची योगक्षेत्रातील कर्तबगारी पाहून चीनमधील दांपत्याच्या मागणीला मान दिला. राहुल हांडे हा चीनमधील मुलीशी विवाहबद्ध होत आहे. योग शिक्षणातून 'हिंदी - चिनी सगे सोयरे' होण्याचा मान संगमनेर तालुक्याला मिळाला आहे. या आगळ्यावेगळ्या विवाहाची तालुक्यात कुतूहलाने चर्चा सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.