Womens Dahi Handi of Pune पुण्यात महिला दहीहंडी उत्साहात साजरी, चेंबूरच्या गोपिका गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी - Gopika Govinda Team From Chembur Broke Dahi Handi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16149187-thumbnail-3x2-puned.jpg)
पुणे पुणे पुण्यात महिला दहीहंडी Womens Dahi Handi in Pune मोठ्या उत्साहात या वर्षी साजरी करण्यात आली. पुण्यातील महिला दहीहंडीचे वैशिष्ट्य Special Feature of Mahila Pune Dahi Handi असे की, या दहीहंडीमध्ये फक्त महिलांनाच प्रवेश दिला जातो. यामध्ये पुरुषांना प्रवेश दिला जात नाही. यामध्ये कुठलेही वेगळे कार्यक्रम न ठेवता डीजेच्या तालावर महिलांना नाचण्याचा तसेच दहीहंडीचा आनंद घ्यावा यासाठी या दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. सर्व महिलांनी मनमोकळेपणे या सण उत्सवांमध्ये सहभागी व्हावे यासाठी हा दहीहंडी उत्सव महिलांसाठी करण्यात येतो. दरवर्षी मुंबईच्या चेंबूर इथून गोपिका नावाचे महिलांचे गोविंदा पथक Gopika Govinda Team From Chembur या दहीहंडीचा थर चढवतात आणि दहीहंडी फोडतात. या वर्षीदेखील हे गोविंदा पथकाने मोठ्या जल्लोषात या ठिकाणी सहभागी होऊन दहीहंडी फोडलेली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST