Jalna Accident: मंठा- लोणार रस्त्यावर भीषण अपघात; पीकअपने पाठीमागून धडक दिल्याने कारने घेतला पेट; आगीत महिला ठार - अमोल गंगाधर सोळंके
🎬 Watch Now: Feature Video
जालना : जालन्यातील मंठा तालुक्यात कारला भीषण अपघात झाला आहे. शेगाव येथून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दांपत्याच्या कारला मंठा- लोणार रस्त्यावर अपघात झाला. या अपघातामध्ये पत्नीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला आहे. परतुर तालुक्यातील कार्ला येथील रहिवासी असलेले अमोल गंगाधर सोळंके आणि त्यांची पत्नी सविता सोळंके (वय 32 वर्ष) हे गुरूवारी सायंकाळी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. आज पहाटे चार वाजेच्या सुमारास ते कार्ला गावाकडे येत असताना मंठा ते लोणार रस्त्यावर असलेल्या महावीर जिनिंगजवळ त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारला अचानक आग लागली. अपघातामध्ये सविता सोळंके या पूर्णता जळाल्या आहेत. पीकअपने कारला पाठीमागील बाजूने धडक दिल्याने कारने पेट घेतला. ही आग विझवणे शक्य न झाल्याने सविता सोळंके यांचा कार अपघातात होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत कार आणि कारमधील सविता सोळंके या पूर्णपणे जळालेल्या होत्या.