Ajanta Caves Rain Video : उन्हाळ्यात अजिंठा लेणीत पावसाळ्यात वाहतो तसा धबधबा; पाहा व्हिडिओ - अजिंठा
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18029498-thumbnail-4x3-mumbai.jpg)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात मेघगर्जनेसह गारपीट झाली असून ऐन उन्हाळ्यातच पावसाळ्यात वाहणारा धबधबा पाहायला मिळाला. शुक्रवारी दुपारनंतर फर्दापुर येथील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात मेक गर्जनसह दमदार पावसाने हजेरी लावली. जवळपास एक तासाहून अधिक वेळ पावसाने हजेरी लावली. त्यात काही काळ जोरदार गारा बरसल्याचा अनुभव पर्यटकांनी अनुभवला. तर दुसरीकडे लहान-मोठे धबधबे कोसळले. लेणी परिसरात असलेल्या वाघूर नदीला देखील पाणी आले, पावसाळ्यात येणारा अनुभव उन्हाळ्यात अनुभवायला मिळाला. त्यामुळे वातावरणात देखील मोठा बदल पाहायला मिळाला. तर कोरडी पडलेली वाघुर नदीला देखील पाणी आले त्यामुळे नेमका पावसाळा सुरू नाही ना असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला.