Water Fountains From Trees: ताडोबातील झाडातून उडाले पाण्याचे फव्वारे; तज्ज्ञांनी सांगितले 'हे' वैज्ञानिक कारण - झाडाच्या खोडातून चक्क पाण्याचे फव्वारे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 2, 2023, 7:42 PM IST

चंद्रपूर : निसर्गात घडणाऱ्या अनेक आगळ्या-वेगळ्या घटनांना सामान्य माणूस चमत्कार समजायला लागतो आणि पुढे यातूनच अंधश्रद्धा निर्माण होत असते; मात्र यामागे विज्ञान असते. ताडोबात अशीच एक आगळीवेगळी घटना घडली. ह्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. एका झाडाच्या खोडातून चक्क पाण्याचे कारंजे उडत असल्याचा हा व्हिडिओ आहे. त्या खोडातून मोठी पाण्याची धार निघताना दिसत आहे. हा व्हिडीओ खरा असला तरी यामागे वैज्ञानिक कारण आहे. जसा माणसांना ट्युमर होतो तसाच झाडांना ट्युमर होत असतो. तो फुटला की अशी पाण्याची धार लागते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वनसंपदेने नटलेला व्याघ्रप्रकल्प आहे. येथील कोळसा वनपरिक्षेत्र येथे एका झाडातून पाण्याची धार निघत असल्याचा व्हिडीओ एकाने काढला. जानेवारी महिन्यात वनविभागाचा चमू गस्तीवर असताना एका झाडाच्या बुंध्याचा पापुद्रा काढला असताना पाण्याची धार लागली. हा व्हिडीओ वनरक्षक प्रणाली वंजारी यांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. Tetminalia tomentosa नावाचे हे झाड आहे. हे करत असताना काही कर्मचारी हे पाणी ओंजळीने पीत असल्याचे देखील दिसत आहे. निसर्गाची ही आगळीवेगळी घटना आहे. मात्र, यामागे विज्ञान आहे. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांच्या म्हणण्यानुसार ही घटना दुर्मीळ जरी असली तरी निसर्गचक्राचाच एक भाग आहे. झाड आपल्या प्रत्येक पानांपर्यंत पाणी पोचविण्याची यंत्रणा विकसित करते. खाली मुळापासून जलवाहिनीच्या माध्यमातून झाडाच्या प्रत्येक भागापर्यंत हे पाणी पोचविण्याचे अविरत कार्य सुरू असते. मात्र, बरेचदा कीड किंवा आणखी जंतूंच्या संसर्गामुळे हे पाणी झाडापर्यंत पोहचू शकत नाही. हा एकप्रकारे झाडाला झालेला आजार आहे. जेव्हा हे पाणी पोहचू शकत नाही तेव्हा एका ट्युमरप्रमाणे ते एका ठिकाणी साचून असते. त्याच्या जलवाहिनीत एक फुगीर भाग निर्माण होतो. तो फोडल्यास त्यातून पाण्याचा कारंजी निर्माण होतो. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नसते. ते दूषित असल्याने पिल्यास व्यक्ती आजारी पडू शकते असे ते म्हणतात. मात्र, निसर्गाची ही दुर्मीळ घटना असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.