Video : तो 'व्हायरल व्हिडिओ' खंडाळा घाटातील नाहीच - तहसीलदार तांबोळींची माहिती - fake video
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने अनेक आकर्षित करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video of Khandala Ghat fake video) होऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना अशा स्वरूपाचे व्हिडिओची चुकीची माहिती देऊन सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. सध्या सोशल मीडियावर खंडाळा घाट येथील शिंगरोबा मंदिर (Shingroba Temple) परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी पडत आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होऊ लागला आहे. मात्र तो व्हिडीओ खंडाळा घाटातील नाही तसेच शिंग्रोबा मंदिराजवळ अशी कुठलीही घटना घडली नसून नागरिकांनी अश्या प्रकारच्या अश्या घटनांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST