Solapur News गाढवावर येऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; सोलापूर ते मंगळवेढा रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी केला निषेध - Solapur Mangalwedha road
🎬 Watch Now: Feature Video
Solapur News सोलापूर सोलापूर ते मंगळवेढा महामार्ग ( Solapur Mangalwedha road ) क्रमांक 166 हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. या रस्त्यावरून वाहनाने जाता येऊ शकत नाही. गाढवावरून जाण्यासारख रस्ता झाला आहे. महामार्ग अधिकारी सुहास चिटणीस यांना अनेकदा निवेदने दिली. स्मरणपत्रे दिली, तरीही दखल घेतली जात नाही. ( Villagers Protest ) म्हणून प्रहार संघटना मंगळवेढा तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी, नवनाथ शिरसठकर, जमीर शेख, अकिब नाईकवाडी, जुबेर पठाण, मुस्तफा शाहपुरे, मोईन पठाण, शाहरुख पठाण यांनी गाढवावर येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. अन्यथा महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांची गाढवावर धिंड काढू असा इशारा देण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST