VIDEO : आधी शिवराज्याभिषेक नंतर लग्नकार्य; पन्हाळा तालुक्यातील विवाहाची चर्चा - कोल्हापूर शिवराज्यभिषेक नंतर लग्न बातमी
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - आज संपूर्ण देशभरात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातल्या पन्हाळा तालुक्यातील लग्नसोहळा सुद्धा चर्चेत आहे. त्याला कारणही खास असून शिवराज्याभिषेक सोहळ्या दिवशीच लग्न असल्याने नव वधू-वराने सुरुवातीला शिवरायांना अभिषेक घातला त्यानंतर आपले लग्नकार्य पूर्ण केले. अगदी विधिवत पद्धतीने त्यांनी हा विधी पार पाडला. त्यांनी पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे गावातील अभिजित पाटील आणि करवीर तालुक्यातील वाकरे गावातील वैष्णवी पाटील यांच्या या अनोख्या विवाहाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST