Viral video : चोरीच्या संशयातून सुरक्षा रक्षकाला झाडाला उलटे टांगून मारहाण, तीघे अटकेत - Viral video of watchman in Bilaspur
🎬 Watch Now: Feature Video
बिलासपूर ( छत्तीसगड ) - सीपत येथील उच्च भट्टीगांव के काहींनी सुरक्षा रक्षकाला चौरीच्या संशयातून झाडाला उलटे टांगून मारहाण करण्यात आली आहे. सुरुवातीला त्या सुरक्षा रक्षकाला नागरिकांनी चोरीच्या संशयातून पोलिसांच्या हवाली केले होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले. त्यानंतर गावातील काही तरुणांनी त्या सुरक्षा रक्षकाला पकडून आधी काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला रात्रभर झाडाला उलटे टांगले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची चौकशी करत तिघांना अटक केली. विश्वजीत भार्गव, शिवराज खरे व मनीष खरे, असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST