Video : बिहारमधील आरोग्य केंद्रात कुत्र्याचा आराम; व्हिडिओ होतोय व्हायरल - Bihar Health System
🎬 Watch Now: Feature Video
बिहार मधील आरोग्य यंत्रणेची ( Bihar Health System ) काय अवस्था आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. मोतिहारी पूर्व चंपारण जिल्ह्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक कुत्रा ऑफिसमधील टेबलवर आराम करताना दिसत आहे. तर कार्यालयात एकही अधिकारी, कर्मचारी दिसत नाही, व्हायरल झालेला व्हिडिओ सुगौली कम्युनिटी हेल्थ सेंटरचा आहे. जिथे एक कुत्रा डॉक्टरांच्या अनुपस्थितीत त्याच्या ( Dog In OPD In Motihari )टेबलावर आराम करत आहे. तर दुसरा कुत्रा टेबलाच्या आत बसला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST