Forcast Cold Increased नागपूरसह विदर्भात थंडीचा जोर वाढला, उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे थंडीची लाट
🎬 Watch Now: Feature Video
नागपूरसह विदर्भात थंडीचा जोर Vidarbha and Nagpur are affected by cold वाढू लागला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत तापमानात 4 ते 5 डिग्रची घट नोंदवण्यात आलेली आहे. त्यामुळे बोचऱ्या थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये हिमवृष्टी सुरू Snowfall started in many states झाली, असल्यामुळे थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे तापमानाचा पारा 10 ते 13 डिग्रीपर्यंत खाली आला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज सकाळी यवतमाळ येथे सर्वात नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर गोंदियात १०.५ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. उपराजधानी नागपुरचे तापमान 11.4 अंशसेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. उत्तर भारतात आलेल्या शीत लहरीमुळे या भागात किमान तापमानाचा पारा Minimum temperature mercury चांगलाच खाली आला आहे. त्यामुळे विदर्भात कडाक्याची थंडी पडू लागली आहे. पुढील काही दिवस उत्तरभारतात थंडीचा जोर वाढेल. त्यामुळे विदर्भात किमान तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. अचानक थंडीचा जोर वाढल्यामुळे नागपुरच्या तिबेटीयन बाजारात उबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली आहे. बाजारात स्वेटर, शाल, कानटोपी या उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST