Vikram Gokhale ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी, पाहा व्हिडिओ - विक्रम गोखले अंत्ययात्रा पुणे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे आपल्या दमदार अभिनयाने मराठी, हिंदी, नाटक, चित्रपट व मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले Veteran actor Vikram Gokhale यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान दुख:द निधन Vikram Gokhale passed away झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.गोखले यांना मधुमेहाचा त्रास बळावल्याने पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात गेल्या दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना जलोदराचा त्रासही होत होता. उपचारादरम्यान, आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. बालगंधर्व रंगमंदिर येथे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या पार्थिव दोन तास ठेवण्यात येणार आहे. कलाक्षेत्रातील तसेच विविध मान्यवर या ठिकाणी येऊन अंत्यसंस्कार करणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST