सरकारी रुग्णालयात अंधार असताना बॅटरीच्या उजेडात उपचार, डिझेलसाठी निधी नसल्याचा डॉक्टरांचा दावा - Unnao Community Health Center
🎬 Watch Now: Feature Video
उन्नावमध्ये आरोग्य सेवा सलाईनवर आहे. मंगळवारी रात्री, बांगरमाऊ शहरातील सामुदायिक आरोग्य केंद्रात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात डॉक्टर आपत्कालीन परिस्थितीवर उपचार करताना दिसले. इमर्जन्सी वॉर्डमध्ये डॉक्टर अंधारात रक्तदाब मोजताना आणि इंजेक्शन सिरिंजमध्ये औषध भरताना दिसत होते. या सामुदायिक आरोग्य केंद्रांवर लाखो रुपयांचे जनरेटर धूळ खात पडले आहेत. जनरेटरमध्ये डिझेल टाकण्यासाठी त्यांच्याकडे बजेट नसल्याचे सामुदायिक आरोग्य केंद्राच्या प्रभारींनी सांगितले. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर आरोग्य केंद्रात अंधार होतो. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रिजेश पाठक सतत रुग्णालयांना भेट देत आहेत आणि उणिवा दूर करण्यास सांगत आहेत, परंतु परिस्थिती जैसे थेच आहे. Unnao government hospital Unnao Community Health Center
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST