Guddu Muslim Viral Video : गुड्डू मुस्लिमच्या व्हायरल व्हिडिओला लागले वेगळे वळण, पहा नेमके काय आहे प्रकरण?
🎬 Watch Now: Feature Video
लखनऊ (उत्तर प्रदेश) : गुड्डु मुस्लिमच्या व्हायरल व्हिडिओला वेगळे वळण मिळाले आहे. व्हायरल माफिया अतिक अहमदकडे काम करणारा गुड्डू मुस्लिम असल्याचा दावा करण्यात आला. या गुंडाने प्रयागराजच्या उमेश पालच्या हत्याप्रकरणात बॉम्बस्फोट घडवून आणला होता. प्रत्यक्षात ओडिशाचा रहिवासी शेख हमीद मोहम्मद यांनी हा व्हिडिओ त्यांचा असल्याचा दावा केला.
शेख हमीद मोहम्मद म्हणाले, की नमाज अदा करण्यासाठी जात होतो. तर व्हायरल व्हिडिओमध्ये 11 एप्रिल रोजी गुड्डू मुस्लिम ओडिशात गेल्याचा दावा करण्यात आला होता. व्हिडिओ व्हायरल होताच शेख हमीदने सांगितले की, गुड्डू मुस्लिम म्हणत व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे आहे. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती गुड्डू मुस्लिम असल्याचा दावाही एसटीएफने फेटाळला आहे. ओडिशा पोलिसांनी सांगितले की, 18 एप्रिल रोजी गुड्डू मुस्लिम ओडिशाच्या बरगडमध्ये लपल्याची माहिती यूपी एसटीएफला मिळाली. काही लोकांची चौकशीही करण्यात आली होती.
प्रयागराजच्या धुमनगंज भागात 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल आणि त्याच्या दोन बंदूकधारी जवानांवर अतिक अहमदच्या गुंडांनी केला होता. यामध्ये उमेश पाल आणि दोन जवान ठार झाले होते. या हत्याकांडाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुड्डू मुस्लिम उमेश पाल यांच्यावर बॉम्ब फेकताना दिसून आला आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांना गुड्डू मुस्लिम हवा आहे. आतापर्यंत असद, गुलाम आणि उस्मान हे पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. तर गुड्डू मुस्लिम आणि साबीर फरार आहेत.