Video: वडिलांच्या मृत्यूनंतर लहान मुलगा डॉक्टरांवर संतापला, म्हणाला... - लहान मुलाचा डॉक्टरांवर रागावतानाचा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांमध्ये आणि डॉक्टरांमध्ये भांडण झाले आहे. या कुटुंबाने डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. यावेळी रुग्णाच्या मुलाने संताप व्यक्त केला आहे. त्याचा तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. वडिलांच्या मृत्यूवर डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप करणाऱ्या या मुलाने अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगा डॉक्टरांना विचारत आहे की, माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, आता तुम्ही त्यांना आणू शकता का? यावेळी डॉक्टरांनी वेळेवर लक्ष दिले असते तर माझे वडील वाचले असते. फक्त मला सांगा ती कोणती ट्रेन आहे जी लखीमपूर खेरीहून लखनौला १० मिनिटात पोहोचेल का, असेही तो म्हणाला आहे.