Thane Crime : मशीनगनसह 20 पिस्तुल, 280 जिवंत काडतुसे जप्त; महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील कारवाई - वागळे इस्टेट पोलीस
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल हत्यार विक्री गुन्ह्यातील फरार आरोपीस, ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटच्या पथकाने मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवरील पळासनेर गावातून अटक केली आहे. या आरोपीच्या ताब्यातून एक मशीनगन, देशी बनावटीचे 20 पिस्तुल, 2 मॅगझीन आणि 280 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुजितसिंग उर्फ माजा आवसिंग याच्या विरोधात हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. तसेच हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. दरम्यान, हा फरार आरोपी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील व धुळे जिल्ह्यातील पळासनेर या गावात पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती, वागळे युनिटच्या पथकास मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे एक पथक पळासनेर या गावात पोहचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने 11 जुलै रोजी आरोपीस सापळा लावून अटक केली.