Chandrakant Patil : शेवटी दहशतवादी देखील माणूसच...; पाहा, असे का म्हणाले चंद्रकांत पाटील - सरहद पब्लिक स्कूल
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : पुण्यातील सरहद पब्लिक स्कूलच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक कार्यावर आपले मत व्यक्त केले. सामाजिक कार्याला तसेच मदत करणाऱ्याला कधीही मरण नाही. एक गेला की दुसरा उभा राहतो. त्यामुळे या देशाला कोणीही संपवू शकत नाही. ज्या राज्यांमध्ये अलगतेची भावना निर्माण झालीय, त्यांची अलगतेची भावना संपवण्यासाठी संजय नहार (सरहद पब्लिक स्कूलचे संस्थापक) त्या मुलांना पुण्यात शिक्षणासाठी आणतात. अशा समस्येवर शिक्षण हाच उपाय आहे. शेवटी दहशतवादी देखील माणूसच आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय.