ट्रक, टँकर चालकांनी पुन्हा पुकारला संप; इंधन तुटवडा होण्याच्या शक्यतेनं नागरिकांची तारांबळ - पुन्हा पुकारला संप
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 10, 2024, 1:46 PM IST
मनमाड Tanker Driver Strike : टँकर चालकांनी पुन्हा संप पुकराला असून संपामुळं मनमाडच्या पानेवाडी भागात असलेलं इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या प्रकल्पातून केला जाणारा पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाला आहे. कंपनीचे अधिकारी टँकर चालकांची समजूत काढत आहेत. मात्र चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं अद्यापही यावर तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलं नाही. तयार नाहीत. यामुळे इंधन तुटवडा होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारनं हिट अँड रन प्रकरणात अत्यंत कडक कायदा अमलात आणायचं ठरवलं आहे. हा कायदा चालकांसाठी अत्यंत क्लेशदायक असून भविष्यात कारण नसताना याचा मोठा भुर्दंड ट्रक चालकांना बसू शकतो. यामुळं ट्रक चालकांनी बेमुदत संप पुकारला होता. मात्र मनमाडला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मध्यस्थी करून संप मागं घेतला होता. मात्र केवळ 9 तारेखपर्यंत संप मागं घेऊ, असं आश्वासन चालकांनी दिलं होतं. मात्र केंद्र सरकारनं कोणत्याही प्रकारची माघार न घेतल्यानं आजपासून पून्हा एकदा संप पुकारण्यात आला आहे. आजच्या या संपामुळे इंधन तुटवडा होण्याची शक्यता आहे. संप मागं घ्यावा, यासाठी अधिकारी वाहन चालकांची मनधरणी करत आहेत. मात्र चालकांनी आता माघार नाही, असा पवित्रा घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनमाड येथील इंधन प्रकल्पातून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि उर्वरित 14 जिल्ह्यात पुरवठा होतो. मात्र आज सुरू असलेल्या संपामुळं या भागात इंधन तुटवडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.