Swarajya Party Andolana : रस्त्यात खड्डे, खड्ड्यात वृक्षारोपण! स्वराज्य पक्षाकडून येवल्यात आंदोलन - स्वराज्य पक्षाचे तालुकाध्यक्ष आदित्य नाईक
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक (येवला) : मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात स्वराज्य पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी येवल्यातील लक्ष्मी आई मंदिर ते नागड दरवाजा, नांदगाव रोड येथे स्वराज्य पक्षाकडून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले. तर रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी, स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. तर शहरातील वाहनधारकांना रस्त्यात पाण्यात अंदाज येत नसल्याने, खड्ड्यात वाहने जाऊन नुकसान होत आहे. यावेळी स्वराज्य पक्षाचे तालुकाध्यक्ष आदित्य नाईक, विकी कवाडे, निलेश राऊत, रामदास गायकवाड, राहुल चित्ते, रमेश ठाकरे, तुषार शिंदे, मयूर सोनवणे, प्रकाश म्हस्के आदी उपस्थित होते.