Stone Pelting On Devotees Bus : वाईमध्ये पार्किंगच्या वादातून भाविकांच्या बसवर दगडफेक; तीन भाविक जखमी, पाहा व्हिडिओ - Stone pelting on bus of devotees
🎬 Watch Now: Feature Video
सातारा : वाईतील महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याने बसच्या काचा फुटून तीन भाविक जखमी झाले. या घटनेमुळे नाना-नानी पार्कच्या रस्त्यावर काचांचा खच पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. बस पार्किंगच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. बस पार्किंगवरून त्याच परिसरातील काही लोकांची भाविकांबरोबर वादावादी झाली. महागणपतीचे दर्शन घेऊन परत जाताना त्यांच्या बसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत बसमधील तीन भाविक जखमी झाले आहेत. त्यामध्ये एक भाविक हा पोलीस कर्मचारी आहे. हे सर्व भाविक पालघर परिसरातून महागणपती दर्शनासाठी वाईत आले होते. दगडफेक करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांकडून भाविक आणि पर्यटकांशी वाद घालण्याचे प्रकार रोजच पाहायला मिळतात. त्यामुळे पर्यटन, तीर्थक्षेत्र असलेल्या वाई शहराच्या लौकीकाला धक्का पोहचत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.