Video : बस दुर्घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली - दीपक केसरकर - शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राष्ट्रपती निवडणूक ( Presidential election ) प्रक्रियेला विधानभवनात ( Legislature ) सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सुमारे 30 टक्के मतदान झाले असून उर्वरित मतदान प्रक्रिया सुरू आहे. शिवसेना ( Shivsena ) आणि शिंदे गटाने एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर उपराष्ट्रपती पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आदेश दिले आहेत. खासदार आणि संसदेचे प्रवक्ते राजन विचारे यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. इंदूरहुन येणाऱ्या बस दुर्घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दु:खात सहभागी आहोत. राज्याकडून योग्य मदत केली जाईल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarka ) यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST