Ambabai Temple: सूर्यग्रहण अन् अंबाबाई मंदिरातील धार्मिक विधी; पाहा व्हिडिओ - सूर्यग्रहण काळात धार्मिक पद्धती
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - सुर्यग्रहनाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 1 तासाच्या या सूर्यग्रहण काळात धार्मिक पद्धतीने पुजाऱ्यांनी अनुष्ठान केले. खंडग्रास सूर्यग्रहण अंतर्गत वेधारंभ पाहटे 3 वाजून 25 मिनिटांनी झाला. तर, स्पर्श सायंकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी झाला. (Ambabai Temple) देवीला सायंकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी स्पर्शस्नान तर सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी मोक्षस्नान झाले. विशेष म्हणजे ग्रहणामुळे माध्यान्ह पुजेनंतर देवीची अलंकार पूजा झाली नाही. या माध्यान्ह पुजेला देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST