Kashmir Snowfall काश्मीरमध्ये हिवाळ्याची चाहूल.. बर्फवृष्टीला सुरुवात.. पहा मनमोहक दृश्ये - काश्मीरमध्ये ताजी बर्फवृष्टी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16704365-thumbnail-3x2-jk.jpg)
श्रीनगर : काश्मीरच्या उंच भागात बर्फवृष्टी Kashmir Snowfall आणि मैदानी भागात पाऊस यामुळे खोऱ्यात नियोजित वेळेआधीच हिवाळा सुरू झाला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. "मध्यरात्री, गुलमर्ग, सोनमर्ग, गुरेझ आणि कर्नासह काश्मीरच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी झाली," अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुलमर्गमध्ये दोन इंचांपेक्षा जास्त बर्फ साचला आहे, तर खोऱ्याच्या उंच भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. ते म्हणाले की, शहरातील जबरवान पर्वत रांगेतही रात्री बर्फवृष्टी झाली. श्रीनगर शहर आणि खोऱ्यातील इतर भागांमध्ये गुरुवारी पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे, ज्यामुळे तापमानात काही अंशांनी घट झाली आहे. लोकांनी या वेळी स्वेटर आणि जॅकेटसारखे हिवाळ्यातील कपडे घालण्यास सुरुवात केली आहे. Kashmir Receives Fresh Snowfall
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST