Silver Ganesha Idol : तब्बल 100 किलो चांदीची गणरायाची मूर्ती; पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
बुलढाणा/जालना : Silver Ganesha Idol : रजत नगरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे तब्बल एक क्विंटल वजनाची चांदीची गणेश मूर्ती तयार करण्यात आलीय. जालना जिल्ह्यातील 'अनोखा गणेश मंडळा'कडून या मूर्तीची मागणी करण्यात आली. यंदाच्या गणेशोत्सवात जालना जिल्ह्यातून चांदीच्या गणपतीची ही विशेष ऑर्डर बुलढाण्यातील खामगावच्या एका सिल्वर हाऊसकडं प्राप्त झाली होती. आलेल्या मागणीनुसार कारागिरांनी चार ते पाच महिने चांदीवर मेहनत घेत ही आकर्षक, देखणी आणि विलोभनीय गणेश मूर्ती तयार केली.
100 किलो वजनाची मूर्ती : खामगावातील एका सिल्वर हाऊसनं जालना येथील 'अनोखा गणेश मंडळा'साठी तब्बल 100 किलो वजनाची तसेच 90 लाख रुपये किमतीची आकर्षक गणेश मूर्ती साकारली आहे. गेल्या चार महिन्यांपासून स्थानिक चार ते पाच कारागिरांनी मिळून आपल्या कलाद्वारे साडेपाच फूट उंचीची ही गणेश मूर्ती साकारल्यची माहिती सिल्वर हाऊसचे मालक राहुल जांगिड यांनी दिलीय. ही मूर्ती 18 सप्टेंबर रोजी मंडळाला सुपूर्द करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय.