VIDEO फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे, सुषमा अंधारेंची टीका - मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याचा भाजपकडून डाव
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले Maharashtra Major projects move to Gujarat जात असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी Shiv Sena Leader Sushma Andhare केला आहे. फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे? असा सवाल ही त्यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याचा डाव भाजपकडून सुरू आहे. फडणवीस यांच्या पुढाकारातूनच महाराष्ट्राला कंगाल केले जात आहे त्यामुळे फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे आहेत असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित Sushma Andhare Criticize Deputy CM Devendra Fadnavis केला. तसेच भाजपची महाराष्ट्रद्रोही भूमिका महाप्रबोधन यात्रेतून उघड करत राहणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. शिंदे गटातील फुटीर आमदारांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे आमदारांमधील अस्वस्थता वाढली आहे. त्यातून शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल आणि महाराष्ट्रात २०२३ मध्ये मध्यावधी निवडणुका लागतील, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी Sushma Andhare Criticize Shinde group केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST